सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (22:17 IST)

'या' वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षात असलेल्या भाजपने अनेकवेळा सरकार पडणार असल्याचा दावा केला आहे. लवकरच भाजपची सत्ता येईल असे भाजपकडून सांगण्यात येते. एका कार्यक्रमादरम्यान माजी मंत्री म्हणू नका दोन-तीन दिवसांत कळेल असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देहू येथे एका खाजगी दुकानाचे उद्घाटन करण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांना व्यासपीठावरुन माजी मंत्री असे संबोधण्यात येत होते. यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे की, ‘माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल तुम्हाला’ असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असून येत्या तीन दिवसांत असे काय घडणार आहे. अशी चर्चा सुरु आहे.