रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जून 2024 (14:41 IST)

साडेतीन वर्षच्या मुलीचे केले यौन शोषण, आरोपीला अटक

महाराष्ट्रातील ठाण्यामध्ये 41 वर्षाच्या व्यक्तीने घरात खेळणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलीचे यौन शोषण केले. या प्रकरणाची माहिती कुटुंबाला मिळताच त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी पॉक्सो एक्ट नुसार कारवाई केली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये एक वाईट कृत्य समोर आले आहे. एका 41 वर्षीय व्यक्तीने साडेतीन वर्षाच्या मुलीचे यौन शोषण केले. तिच्या कुटुंबाने थेट पोलीस स्टेशन गाठले. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे. 
 
पोलीस अधिकारींनी सांगितले की, ही चिमुरडी खेळण्यासाठी आरोपीच्या घरी गेली. त्यावेळी या नराधमाने तिचे यौन शोषण केले. मुलगी जेव्हा घरी परत आली तर तिची अवस्था पाहून घरच्यांना संशय आला. तेव्हा कुटुंबीयांनी तिची चौकशी केली. व कुटुंबाला कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलीस या प्रकरणाबद्दल आरोपीची चौकशी करीत आहे. 

Edited By- Dhanashri Naik