शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 मार्च 2022 (11:24 IST)

विहिरीत आढळले आईसोबत तीन चिमुकल्यांचे मृतदेह

अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका विहिरीत आईसह तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
 
ही घटना संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावातील असून तीन लहान मुलांमध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास विहिरीत चार मृतदेह तरंगताना आढळून आले. चार मुलांमध्ये 28 वर्षीय आई स्वाती ढोकरे, पाच वर्षीय मुलगी भाग्यश्री, साडे तीन वर्षीय मुलगी तन्वी आणि सहा महिन्यांचा मुलगा शिवम यांचा समावेश आहे. हे सर्व मृतक खांडगेदरा गावातील निवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
 
घटनेवेळी मृतक महिलेचा पती परगावी गेला होता आणि सासरे शेतावर गेले होते. सासरे दुपारी जेवणासाठी घरी आले असताना घरात कुणीच नव्हतं. त्यामुळे त्यांनी सून आणि नातवंडांचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांना घराच्या जवळच असलेल्या विहिरीजवळ मृतक महिलेची चप्पल दिसून आली.
 
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या शवविच्छेदनाचे रिपोर्ट्स आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण काय आहे याबाबतची माहिती समोर येईल.