सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2019 (13:47 IST)

मुंबई-पुणे महामार्गावरील भीषण अपघातामध्ये ३ ठार

रायगड – मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर आणि नारळ वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकाचा उपचाऱादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना बाहेर काढले.
 
दरम्यान, मुंबईकडे निघालेला नारळाचा ट्रक तीव्र उतारावरून लोखंडी कॉईल घेऊन जात असलेल्या ट्रकला मागून धडकला. यामध्ये पुढील ट्रकचा अगदी चेंदा-मेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक व खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.