रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: त्रंबकेश्वर , शनिवार, 17 मार्च 2018 (09:08 IST)

श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी मेडीटेशन सेंटर ची स्थापना

श्री क्षेत्र येथे येणाऱ्या भाविकांसाठी अध्यात्मिक ज्ञान व राजयोग मेडीटेशन चा लाभ मिळण्यासाठी नाशिक येथील ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे त्रंबक रिंग रोड येथील निरंजनी आखाडा जवळील वास्तू मध्ये राजयोग मेडीटेशन सेंटर उभारण्यात आले आहे-

त्रंबकेश्वर शहर व सोबतच्या खेडे पाड्यांवरील लोकांना व्यसन मुक्त,  तणाव मुक्त व आत्महत्या मुक्त  होवून अध्यात्मिकता व सुख शांन्तिमय जीवन व्यतीत करण्यासाठी या राजयोग मेडीटेशन सेंटरची निर्मिती करण्यात आल्याचे मुख्या सेवाकेंद्र प्रमुख राजयोगिनी ब्रह्माकुमारी  वासंती दीदी यांनी सांगितले. या राजयोग मेडीटेशन सेंटर चे उत्घाटन रविवार दि. १८ मार्च रोजी भव्य समारंभाने करण्यात येणार आहे.  यात दुपारी २ वाजता मान्यवरांच्या शुभ हस्ते शिव ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तद्पच्च्शात शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. यात दोन ट्रक्टर वर सतयुगीं देवी देवतांची  सजीव प्रतिकृती व शिव परमात्म्याची ज्योतिर्लिंग प्रतिमा सजविण्यात येणार आहे. सदर पदयात्रा गजानन संस्थांच्या गेट पासून सुरु होवून संपूर्ण गावात संचालन होणार आहे. या पदयात्रेचे जागोजागी मान्यवर व भाविकांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा समारोप त्रंबक येथील सोनार वाडा येथे भव्य अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने  
होणार आहे. या कार्यक्रमाचा अधिक अधिक लोक्कांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रम संयोजकांनी केले आहे.