1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (08:17 IST)

अमरावती मार्गावरील शिंगणापूर फाट्याजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात

यवतमाळ – अमरावती मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात 1 प्रवासी ठार 18 प्रवाशी जखमी
अमरावती -यवतमाळ मार्गावरील शिंगनापूर फाट्याजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला या अपघातात 1 प्रवाशी ठार झाला असून 18 प्रवाशी जखमी झाले आहे.
 
भरधाव वेगाने जाणाऱ्या अनियंत्रित ट्रक ने यवतमाळ येथून अमरावती कडे जाणाऱ्या बस ला जोरदार धडक दिली त्यात एक प्रवासी जागीच ठार झाला असून 18 प्रवाशी जखमी झाले आहे. जखमींना नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती वाहतूक अधिकारी राठोड यांनी दिली आहे.