मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मृत्यू

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी शिवारातील तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. करण सुभाष निकाळजे (8) आणि पवन दिलीप आढे (14) अशी मृत मुलांची नावं आहेत. त्या दोघांचा तलावातील गाळात पाय रुतल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
 
शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने मंठा येथील पवन मामाकडे कुऱ्हाडी गावी आला होता. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत असल्याने शरीराला गारवा मिळावा यासाठी करण आणि पवन तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते तलावातील गाळात अडकले. यावेळी बाजूच्या माळावरील शेळ्या हाकणाऱ्या मुलाने दोघांना बुडताना बघताच याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. मात्र ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते.