शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मात्र उद्धव ठाकरे यांचा हसून नमस्कार

मुंबई महापालिकेतील महापौरपदाचा तिढा कायम आहे. तर युतीती मोठा तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील बेळगाव विमानतळावर समोरासमोर आले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांशी न बोलता फक्त स्मितहास्य करत नमस्कार केला आणि आपला मार्ग धरला आहे.
 
उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाहून कोल्हापुरातून तर चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवेंच्या लग्नावरुन औरंगाबादहून परतले होते.त्यावेळी दोघं अनपेक्षितपणे समोरासमोर आले.  मात्र कुठलीही चर्चा न करता उद्धव ठाकरे यांनी फक्त हसून हात जोडून केला नमस्कार केला.