शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 22 जानेवारी 2023 (15:00 IST)

उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष पद सोडणार?

uddhav
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख पदाची मुदत 23 जानेवारी रोजी संपत आहे. सध्या शिवसेना कोणाची हा वाद निकाल अजून लांबणीवर आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुखाचे पद उद्धव ठाकरे सोडणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.  23 जानेवारी रोजी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत देखील संपत आहे त्यासाठी ठाकरे गटाकडून अर्जाद्वारे नेता निवडीसाठी प्रतिनिधी सभा घेण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाने यावर काहीही उत्तर दिले नाही.तसेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला ठाकरे गट वर्चस्व कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्याचे वृत्त मिळाले आहे. 23 जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळ संपत असल्यामुळे या पदी आता कोण बसणार हा प्रश्न उपस्थित आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख पद, पक्ष आणि चिन्ह कोणाचं या बाबतील निकाल अद्याप केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच न्यायालयानं दिलेलं नाही. 20 जानेवारीला निवडुणक आयोगानं निकाल दिलेला नसून सुनावणीची तारीख 30 जानेवरीला दिली आहे. 
 
Edited by - Priya Dixit