सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (08:24 IST)

मग आम्ही त्यांना चित्ता सरकार म्हणायचे का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला

uddhav thackeray
तब्बल ७० वर्षानंतर नामशेष झालेला चित्ता भारतात पुन्हा दाखल झाला. नरेंद्र मोदींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानण्यात येत आहे. मात्र, यावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. आज अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये चित्ता हा प्राणी आला आहे. मराठीमध्ये आपण त्याला चित्ता बोलतो आणि इंग्लिशमध्ये चिता बोलतात. आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आम्ही त्यांना चित्ता सरकार म्हणायचे का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. या प्रश्नावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना चांगलं बोलताच येत नाही. त्यांच्याकडे चांगली वाक्य नसली तर त्यांनी मला फोन करावा, असा सल्ला त्यांनी ठाकरेंना दिला आहे.

चित्ता सरकारवरुन निशाणा
२०१७-१८ मध्ये दक्षिण कोरियातून ‘हम्बोल्ड’ पेंग्विन राणीच्या बागेत आणले गेले होते. पेंग्विन खरेदीसाठी आणि त्यांच्यासाठी वातानुकूलित कक्ष तयार करण्यासाठी एकूण २५ कोटींचा खर्च करण्यात आला. त्यावेळेस मुंबईच्या महापौर राहिलेल्या किशोरी पेडणेकरांनी त्या पेंग्विनच नामकऱणही केलं होतं. त्यानंतर अनेक वेळा भाजपाकडून शिवसेनेची पेंग्विन सेना म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आता काल (१७ स्प्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेले ८ चित्ते सोडण्यात आले.