गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (08:37 IST)

उर्मिला मातोंडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना 'असे' दिले प्रत्युत्तर

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. अखेर सर्वोच्च न्यायालयाने  भाजपच्या 12 आमदारांना दिलासा आहे.  न्यायालयाने 12 आमदारांचं निलंबन रद्द केल्यानतंर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत  करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी पलटवार केला आहे.
 
”अभिनंदन! आनंद आहे ‘लोकशाही’ वाचली याचा…पण अध्यक्ष महोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्तीच होत नाही आहे, त्यावरही शोभेकरता का असेना कधी तरी आवाज उठवा. इथे फक्त 50 लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम 12 करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे”, असं ट्विट करत उर्मिला मातोंडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.