गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जून 2023 (15:35 IST)

Wardha: केक कापताना स्प्रेचा भडका होऊन बर्थडे बॉयचा चेहरा भाजला

वाढदिवस हा आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण दिवस आहे. हा दिवस प्रत्येकासाठी खास असतो. मित्र आप्तेष्ट या दिवशी शुभेच्छा देतात. तरुण वर्ग या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात . सध्या तरुण वर्ग धांगडधिंगा आणि हुल्लडबाजी करून वाढदिवस साजरा करतात. धिगाणा करत वाढदिवस साजरा करण्याचा नादात अनेकदा अपघात होत असतात. रात्री रस्त्यावर मित्र मैत्रिणींचा घोळका वाढदिवस साजरा करतात. मस्तीत वाढदिवस साजरा करणे काही तरुणाच्या अंगाशी आले आहे.वर्ध्याच्या सिंदी मेघे येथे हा अपघात घडला आहे. वाढदिवस साजरा करताना उडवल्या जाणाऱ्या स्प्रेमुळे एका बर्थडे बॉयचा चेहरा भाजला आहे. रितिक वानखेडे असे या मुलाचे नाव आहे. 

केक कापताना उडवला जाणारा स्प्रे तोंडावर मारल्यामुळे फायर गन मधून ठिणगी पडून हा अपघात झाला. रितिकच्या नाका आणि काना जवळ किरकोळ जखम झाली आहे. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आल्यामुळे आणि आगीवर त्वरित नियंत्रण मिळवल्यामुळे सुदैवाने मोठा अपघात झाला नाही. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या मध्ये रितिक केक कापताना दिसत आहे.केक कापत असताना त्याच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला. फायरगनची ठिणगी पडल्यामुळे त्याच्या चेहऱ्याला आग लागली आणि तो किरकोळ भाजला.    
 त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने मोठा अपघात टळला.लग्नसमारंभ आणि वाढदिवसाच्या पार्टीत वापरले जाणारे स्प्रे अत्यंत ज्वलनशील असतात. त्याच्या ज्वलनशीलतेचे कारण म्हणजे त्यात वापरलेले अल्कोहोल. अल्कोहोल हे ज्वलनशील रसायन असल्याने ते अनेक प्रकारे वापरले जाते. त्याचप्रमाणे स्प्रे बनवण्यासाठीही त्याचा वापर होतो.आणि अनेकदा अपघात घडतात. अशा ज्वलनशील पदार्थांचा वापर जपून करावा. 
 
 
Edited by - Priya Dixit