शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (16:52 IST)

आम्ही राज ठाकरेंच्या पाठिशी आहोत : राजू शेट्टी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून नोटीस आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी भडकले आहेत. देशातील तपास यंत्रणा मोदी-शहा जोडगोळीचे कार्यकर्ते आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे. या लढ्याध्ये आम्ही राज ठाकरेंच्या पाठिशी आहोत असे शेट्टी यांनी  सांगितले आहे. 
 
झालेला व्यवहार २० ते २२ वर्षापूर्वीचा असल्याने आतापर्यंत ईडी झोपा काढत होती का? अशी विचारणा त्यांनी केली. सरकारविरोधात रान उठवल्यास तपास यंत्रणा मागे लावल्या जातात असा हल्ला राजू शेट्टी यांनी चढवला. राज यांनी ईव्हीएम विरोधी भूमिका घेतल्यानेच ईडीचा ससेमीरा लावल्याचा घणाघात शेट्टी यांनी केला.