शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 जून 2021 (07:54 IST)

शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्याचा उलटअर्थी अर्थ लावायचा असतो : नारायण राणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात सूचक विधान केलं होतं. मात्र, शिवसेनेबाबतच्या त्यांच्या विधानावरून भाजपाकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे.भाजपा आमदार राम कदम यांनी यासंदर्भात शरद पवारांना लक्ष्य केलेलं असताना आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी शरद पवारांच्या विधानावर खोचक ट्वीट केलं आहे. “शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्याचा उलटअर्थी अर्थ लावायचा असतो. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे”, असं नारायण राणे म्हणाले आहेत. 
 
दरम्यान, आपल्या ट्वीटमध्ये नारायण राणे लिहितात, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार असं म्हणाले आहेत. जरी शरद पवार असं म्हणाले असले, तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार नाहीत”, असं भाकित राणेंनी या ट्वीटमध्ये केलं आहे.