बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 28 डिसेंबर 2024 (17:16 IST)

तिसरी मुलगी झाल्यानंतर पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले, परभणीतील घटना

arrest
आज मुला आणि मुलीत काही भेद नाही असे म्हणतात आज मुली देखील मुलांप्रमाणे सर्व कामे करत आहे. पण आज देखील काही भागात मुलीच्या जन्मावर शोक केला जातो. परभणीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला तिसरी मुलगी झाली म्हणून एका पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.  

सदर घटना महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नाका परिसरात 26 डिसेंबरच्या रात्रीची आहे.  पत्नीने तिसऱ्यांदा पुन्हा मुलीला जन्म दिला याचा राग महिलेच्या पतीला आला आणि त्याने महिलेला पेट्रोल ओतून पेटवून दिले. 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला तीन मुली आहे. पत्नीने तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिल्याचा राग पतीच्या मनात होता. तो नेहमी पत्नीला मारहाण करत शिवीगाळ करायचा. 

26 डिसेंबरच्या रात्री दोघात वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला. आरोपीने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पालटवून दिले. महिला आरडाओरड करत सगळीकडे धावू लागली. काही लोकांनी आज विझवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रयत्नांनंन्तर आगीवर नियंत्रण मिळवता आले मात्र तो पर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीची चौकशी सुरु केली आहे. या घटनेनन्तर परिसरात संतापाचे वातावरण आहे. 
Edited By - Priya Dixit