सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 डिसेंबर 2023 (10:45 IST)

सेल्फी काढताना पाय घसरून महिलेचा मृत्यू

सेल्फी काढताना अनेकदा अपघात घडत असतात. तरीही लोक सेल्फी काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. असेच काहीसे घडले आहे एका दांपत्यासोबत.लग्नानंतर फिरायला निघालेल्या दांपत्या सोबत असे काही घडेल त्याची कोणीच कल्पना केली नसेल. सेल्फी पॉईंटवरून सेल्फी काढताना पाय घसरून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना प्रबळगडावर घडली आहे. शुभांगी विनायक पटेल असे या मयत महिलेचे नाव आहे. 

शुभांगी पटेल आणि विनायक पटेल यांचे वीस दिवसांपूर्वी लग्न झाले असून ते दोघे फिरायला लोणावळा येथे गेले होते. नंतर ते 28 डिसेंबर रोजी ट्रेकिंगसाठी प्रबळ येथे गेले. प्रबळगडावर सेल्फी घेत असताना शुभांगीचा पाय घसरला आणि ती वरून खाली पडली.  विनायक ने तिला डोळ्यादेखत पडताना पहिले. शुभांगी अंदाजे दीड ते दोन हजार फूट खाली कोसळली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिकांच्या आणि निसर्गमित्रांच्या मदतीने महिलेला बाहेर काढले. तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्री आठच्या सुमारास डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.  

Edited By- Priya DIxit