बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जानेवारी 2025 (21:21 IST)

नागपुरात लग्नास नकार दिल्याने तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या, प्रियकरावर गुन्हा दाखल

suicide
नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रयूषा असे मयत तरुणीचे नाव आहे.

रंगलाल सहदेव येळेकर (वय 54, रा. देवनगर, कामठी) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
प्रयूषा आणि सागर कॉलेज मध्ये एकत्र शिकायचे ते मित्र होते आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात होते. सागर ने प्रयुषाला लग्न करण्याचे वचन दिले. ते दररोज फोनवर बोलायचे आणि भेटायचे 

प्रयुषाने आपल्या आई आणि बहिणीला  प्रेमप्रकरणाची माहिती दिली होती. सागरने त्याच्या आई व बहिणीशी लग्नाबाबत बोलूनही लवकरच कुटुंबीयांना भेटण्याची माहिती दिली होती. 29 डिसेंबर रोजी प्रयुषा आणि सागर यांच्यात फोनवर बोलणे झाले.
 
यावेळी सागरने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. घरच्यांच्या विरोधाची माहिती दिली. दोघांमध्ये फोनवरून बराच वेळ वाद सुरू होता.
 
5 वाजता प्रयुषा तिच्या खोलीत गेली. त्यावेळी आई-वडील आणि भाऊ बाहेर गेले होते. 5.30 वाजता भाऊ घरी आल्यावर त्यांच्या मामाचा मुलगा बाहेर बसला होता. त्याने सांगितले की प्रयूषा खोलीत असल्याचे सांगितले. भावाने फोन केल्यावर तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. 

दार ठोठावूनही काहीच उत्तर न आल्याने अंकितने आत डोकावले. प्रयुषा फासावर लटकलेली दिसली. अंकितने दरवाजा तोडून कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. तपासात असे आढळून आले की 29 डिसेंबर रोजी सागर आणि प्रयुषाचे एकमेकांशी 43 वेळा फोनवर बोलणे झाले होते.
 
सागर लग्नास नकार देत होता. त्यामुळे प्रयुषा तणावात होती. याच कारणावरून त्याने आत्महत्या केली. प्रयुषाच्या कुटुंबियांच्या तक्रारी वरुन पोलिसांनी प्रियकर सागर विरुद्ध प्रयुषाला आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करत गुन्हा दाखल केला आहे.  
Edited By - Priya Dixit