बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जानेवारी 2025 (15:23 IST)

ठाण्यात क्रूरतेचा कळस! फेसबुक फ्रेंडने महिलेवर अनेक वेळा बलात्कार केला, सिगारेट- गरम तव्याने चटके दिले

rape
ठाणे जिल्ह्यात नराधमाने 27 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल करत लग्न करण्यास भाग पाडले आणि तिला सिगारेटचे आणि तव्याचे गरम चटके दिल्याचा आरोप करण्यात आला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची चार वर्ष पूर्वी सोशलमिडीयाच्या माध्यमातून आरोपीशी मैत्री झाली. त्यांनतर या घटनेला सुरुवात झाली. 

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 38 वर्षीय पुरुष आणि त्याच्याआईसह कुटुंबातील 5 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरातील रहिवासी असलेला आरोपी 2021 मध्ये फेसबुकच्या माध्यमाने तिचा मित्र बनला नंतर त्याने मैत्री वाढवून महिलेला एका लॉज मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला नंतर तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवले तसेच तिच्यावर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा बलात्कार केला.
नंतर तिला ब्लॅकमेल करून लग्न करण्यास बाध्य केले.नंतर तिला मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर नेले तिथे त्यांनी तिच्यावर अमानुष अत्याचार केले. तिच्या भुवया आणि केस कापले तिला एका घरात ओलीस ठेवले 
आरोपीने तिला सिगारेटचे चटके दिले. तिच्याकडून आधारकार्ड पॅनकार्ड आणि बॅंकेचे पासबुक काढून घेतले तसेच कर्ज घेण्यासाठी तिच्या कागदांचा गैरवापर केला. 

तसेच तिला वडिलांकडून पैसे मागवण्यास भाग पडले असे केले नाही तर तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.आरोपीच्या छळाला कंटाळून पीडित महिलेने रविवारी आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अद्याप त्याला अटक केली नाही. 
या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit