शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मार्च 2023 (21:33 IST)

लहान भावाचे अधिक लाड होतात म्हणून मोठ्या भावाकडून त्याचा खून !

murder
केवळ आई-वडील लहान भावाचे अधिक लाड करतात या किरकोळ कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाचा चाकू भोसकून खून केल्याची घटना कणकवली तालुक्यातील कुंभवडे चिरेखनवाडी येथे बुधवारी रात्री 10.45 वा. सुमारास घडली. मोठा भाऊ आयसीन अंतोन डिसोजा (37) याने केलेल्या हल्ल्यात छोटा भाऊ स्टनी अंतोन (35) मयत झाला आहे.आयसीन डिसोजा घराच्या स्वयंपाक खोलीमधील चाकू छोटा भाऊ स्टडी याच्या पोटात खूपसला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेबाबत आई मार्टिन यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार आयसीन याच्यावर भा.द.वि. कलम 302 नुसा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी चपळाईने हालचाली करत आयसीन याला रात्रीच अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor