शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मे 2023 (21:42 IST)

कुणकेश्वर समुद्रात युवक बुडाला

water death
देवगड कुणकेश्वर – चांदेलवाडी येथील स्वराज सुनील पेडणेकर हा २१ वर्षीय युवक कुणकेश्वर समुद्रात बुडाला. त्याचा मृतदेह सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुणकेश्वर- कातवणेश्वर समुद्र किनारी भागात आढळून आला. स्वराज हा दुपारी मित्रांसमवेत समुद्रात आंघोळीसाठी गेला होता. मात्र, पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात बुडाला. या घटनेमुळे कुणकेश्वर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor