शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मे 2024 (09:18 IST)

पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाची गोळ्या झाडून हत्या

murder
पुण्याच्या पिंपरी चिंचवड मध्ये एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या  करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरीच्या सांगावी परिसरात हा प्रकार घडला. हे प्रकरण गँगवरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले असून शव विच्छेदनासाठी पाठविले आहे. दीपक कदम असे मयत तरुणाचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली. अज्ञाताने तरुणावर दोन राऊंड फायरिंग करण्यात आले. या गोळीबारात दीपक कदम हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचाराधीन असता त्यांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणी दीपकवर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहे. 
दीपक हा पण टपरी वरून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit