शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (11:29 IST)

Flashback 2019 मधील सुपरहिट आणि चर्चित चित्रपट

वॉर
रितिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची उत्तम केमिस्ट्री वॉर या चित्रपटात दिसून आली. 2 ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई केली.
कबीर सिंह :- 
दक्षिण भारतातल्या अनेक चित्रपट बऱ्याच वेळा बॉलीवूड मध्ये बनतात. पण कबीर सिंह ह्या चित्रपटाने तर लोकांवर भुरळ पाडून अफाट नाव मिळवले आहे. शाहिद कपूर आणि  कियारा अडवाणी अभिनित हा चित्रपट 21 जून 2019 रोजी प्रदर्शित झाला असून त्याचे बजेट 60 कोटीं रुपये एवढे होते. आणि चित्रपटाने 278.24 कोटींची कमाई केली. हा चित्रपट जवळपास 5 आठवडे चित्रपटगृहात लागला होता. ह्या चित्रपटाने सुमारे 135 कोटी रुपये पहिल्या आठवड्यात, 80 कोटी रुपये दुसऱ्या आठवड्यात आणि सुमारे 36 कोटी रुपये तिसऱ्या आठवड्यात कमाई केली. तेलगू चित्रपट अर्जुन रेड्डी चा रूपांतरण कबीर सिंह असे.  
उरी: द सर्जिकल स्ट्राइक :-  
ह्या वर्षी सर्वात जास्त चित्रपटांच्या रेकॉर्ड मोडणाऱ्या चित्रपटात उरी : द सर्जिकल स्ट्राइक ची विक्रमी नोंदणी झाली असून 11 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी ह्या चित्रपटाने 8.20 रुपयांची अफलातून कमाई केली. हळू हळू या चित्रपटाने आपले प्रभुत्व मिळवून 245.36 कोटीं रुपयांची कमाई केली. विक्की कौशल हा प्रमुख भूमिकेत होता.
भारत
सलमान खान आणि कॅटरीना कैफ अभिनित भारत प्रेक्षकांनी नाकारला असला तरी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झाल्यामुळे या सिनेमाने 310 कोटींहून अधिक कमाई केली.
मिशन मंगल:-
अक्षय कुमार अभिनित मिशन मंगल हा चित्रपट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी ह्या चित्रपटाने 29.16 कोटीं रुपयांची कमाई केली असून आतापर्यंत चित्रपटाने 178.11 रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कीर्ती कुल्हारी,शर्मन जोशी, विद्या बालन असे कलाकारांची उत्कृष्ट भूमिका आहे. 
केसरी:-
21 मार्च 2019 रोजी अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा अभिनित केसरी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 21.06 कोटीं रुपयांची कमाई केली असून आता पर्यंत एकूण 154 .41 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट अनुराग सिंग दिग्दर्शित सारागढीच्या युद्धावर आधारित आहे.
टोटल धमाल:-
अनिल कपूर, अजय देवगण, माधुरी दीक्षित, अभिनित चित्रपट टोटल धमाल 22 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी 16.50 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने एकूण 154.23 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे की या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नसून ह्या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शक इंद्र कुमार आहे.
सुपर 30
हृतिक रोशन अभिनित चित्रपट सुपर 30. 12 जुलै 2019 रोजी प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने 11.83 कोटी रुपयांची कमाई केली.या चित्रपटाने एकूण 146.91 कोटींची कमाई केली. चित्रपटात हृतिक सुपर 30  चे सूत्रधार आनंदची भूमिका साकारली. 
गली बॉय
रणवीर सिंग आणि आलिया भट्ट अभिनित चित्रपट गली बॉय 14 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित झाला .या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया एका आगळ्या वेगळ्या वेषात दिसले असून ह्या चित्रपटात रणवीर ने रॅप केले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाची कमाई 19.40  कोटी रुपये होती. एकूण कमाई 140.25 कोटी रुपयांची झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तर यांनी केले होते.
दे दे प्यार दे
अजय देवगण, रकुलप्रीत आणि तब्बू अभिनित चित्रपट17 मे 2019 रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाने 10.41 कोटींची कमाई केली. चित्रपटाने एकूण 103.64 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटात अजय देवगण बऱ्याच दिवसानंतर विनोदी पात्रात दिसला. चित्रपटाचे दिग्दर्शन आकिव अली यांनी केले आहे.
लुका छिपी
बॉलीवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचा चित्रपट लुका छिपी हा 100 कोटींच्या रांगेत सामील झाला असून ह्या चित्रपटात कार्तिक सोबत कृती सॅनॉन दिसली. ह्या चित्रपटाने उत्कृष्ट कामगिरी बजावली असून ह्या चित्रपटाची गाणी पण कर्णप्रिय आणि लोकप्रिय झाली. पहिल्या दिवशी चित्रपटाने 8.01 कोटींची कमाई केली तर एकूण 103.64 कोटींची कमाई केली.