बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By

About Sai Baba and His Family शिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या

saibaba
साईबाबा जन्म स्थळ
महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 सप्टेंबर 1830 रोजी झाला होता. 
 
About Sai Baba and Hhis Family साईबाबांच्या आई-वडिलांचे नाव
साईबाबांच्या वडिलांचे नाव परशुराम भुसारी आणि आईचे नाव अनुसूया असे होते. यांना गोविंद भाऊ आणि देवकी अम्मा असे ही ओळखले जात होते. काही लोकं वडिलांना गंगाभाऊ असेही हाक मारायचे. यांचे 5 पुत्र होते ज्यांचे नाव- रघुपती, दादा, हरीभाऊ, अंबादास आणि बलवंत असे होते. बाबा परशुराम यांची तिसरी संतान होते ज्यांचे नाव हरीभाऊ असे होते.
 
साईबाबांचे वंशज
साईबाबांचे वंशज आजदेखील औरंगाबाद, निजामाबाद आणि हैदराबाद येथे राहतात. साईंचे मोठे भाऊ रघुपती यांचे दोन पुत्र होते- महारुद्र आणि परशुराम बापू. महारुद्र यांचे दोन पुत्र आहे त्यातून रघुनाथजी यांच्याकडे पाथरी येथील घर होते. 
 
रघुनाथ भुसारी यांना 2 पुत्र आणि एक पुत्री आहे- दिवाकर भुसारी, शशिकांत भुसारी आणि मुलगी नागपूर येथे राहते. दिवाकर हैदराबादमध्ये आणि शशिकांत निजामाबाद येथे राहतात. 
 
परशुराम यांचे पुत्र भाऊ यांना प्रभाकर राव आणि माणिक राव नामक 2 पुत्र होते. प्रभाकर राव यांचे प्रशांत, मुकुंद, संजय नामक पुत्र आणि लता पाठक त्यांची मुलगी आहे. हे औरंगाबादमध्ये राहतात. माणिकराव भुसारी यांना 4 मुली आहेत- अनिता, सुनीता, सीमा आणि दया.