बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2023 (22:38 IST)

Worship Lord Sri Rama along with Mahadev श्रावण महिन्यात महादेवासह करा प्रभू श्रीरामाचे पूजन

worship Lord Sri Rama along with Mahadev
worship Lord Sri Rama along with Mahadev 'महादेव' रामाचे इष्ट व 'राम' महादेवाचे इष्ट आहे. हा दुर्लभ संयोग आहे की उपास्य आणि उपासक यांचा आपसात इष्ट भाव असो आणि संतजन या स्थितीला 'परस्पर देवोभव' असे नाव देतात.
 
श्रावण महिन्यात महादेवाचा प्रिय मंत्र 'ॐ नमः शिवाय' व 'श्रीराम जय राम जय जय राम' मंत्राचा उच्चारण करत महादेवाला जल चढवण्याने प्रभू प्रसन्न होतात.
 
प्रभू राम म्हणतात:
 
'शिव द्रोही मम दास कहावा सो नर मोहि सपनेहु नहि पावा।'
 
- अर्थात महादेवाचा द्रोह करून मला प्राप्त करू इच्छित असलेला स्वप्नातही मला प्राप्त करू शकत नाही. म्हणूनच श्रावण महिन्यात शिव आराधनेसह श्रीरामचरितमानस पाठ करणे महत्त्वाचे आहे.
 
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम 14 वर्षाच्या वनवास काळ दरम्यान जेव्हा जाबालि ऋषींना भेटायला नर्मदा तटी आले तेव्हा हे स्थळ पर्वताहून वेढलेले होते. रस्त्यात महादेवही त्यांना भेटण्यासाठी आतुर होते परंतू देव आणि भक्तामध्ये ते येऊ इच्छित नव्हते. प्रभू रामाच्या पायाला दगड टोचू नये म्हणून महादेवाने त्यांना लहान गोल आकार दिला म्हणूनच कंकडा-कंकडात शंकर असल्याचे म्हणलं जातं.
 
जेव्हा प्रभू राम रेवा तटी पोहचले तेव्हा गुहातून नर्मदा जल प्रवाहित होत होतं. राम येथे थांबले आणि वाळू एकत्र करून एका महिन्यापर्यंत त्या वाळूला नर्मदा जलाने अभिषेक करू लागले. शेवटल्यादिवशी महादेव स्वयं तिथे विराजित झाले आणि या प्रकारे प्रभू राम आणि महादेव यांचे मिलन झाले.