गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (10:02 IST)

Shravan 2024 श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? जाणून घ्या सोमवार कधी-कधी?

sawan 2024
Shravan 2024 हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. श्रावणात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते. या लेखात श्रावण महिना 2024 शी संबंधित सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.
 
यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे, कारण हा महिना भगवान शिवाच्या दिवशी म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे. यंदाचा श्रावण महिना 5 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल आणि 3 सप्टेंबर 2024 रोजी संपेल. यंदा 5 श्रावणी सोमवार येत आहे. 
 
श्रावण सोमवार तिथी
पहिला श्रावण सोमवार - 5 ऑगस्ट 2024
दुसरा श्रावण सोमवार - 12 ऑगस्ट 2024
तिसरा श्रावणी सोमवार - 19 ऑगस्ट 2024
चौथा श्रावणी सोमवार - 26 ऑगस्ट 2024
पाचवा श्रावणी सोमवार - 2 सप्टेंबर 2024 (अमावास्या)
 
व्रत पूजा
या पवित्र महिन्यात भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात. श्रावण महिन्यात अनेक भाविक सोमवारी उपवास करतात आणि शुद्ध मनाने भगवान शंकराची पूजा करतात. विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळा गौरीचे व्रत करतात. काही मुली इच्छित पती मिळविण्यासाठी आणि भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सोमवारचे व्रत करतात. श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये भक्त पवित्र गंगाजवळील विविध धार्मिक स्थळांना भेट देतात आणि तेथून गंगाजल आणतात आणि शिवरात्रीच्या दिवशी ते भगवान शंकराला अर्पण करतात.
 
श्रावण पूजा विधी
भक्त सकाळी लवकर उठतात आणि पूजा सुरू करण्यापूर्वी स्नान करतात. भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्तीसमोर दिवा लावून प्रार्थना करतात. महादेवाच्या पिंडीला अभिषेक करतात. शिव चालिसा, शिव तांडव स्तोत्र आणि श्रावण महिन्याची कथा पाठ करतात. शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला पंचामृत (दूध, दही, साखर, मध आणि तूप) अर्पित करतात. शिवलिंगाला जल अर्पण करून फुले व बेलपत्राने सजवतात. बेलपत्र हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. भगवान शंकराला मिठाई अर्पण करतात.