रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: हैद्राबाद , शनिवार, 29 जुलै 2017 (11:25 IST)

पीव्ही सिंधू बनली उपजिल्हाधिकारी

रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या पी.व्ही .सिंधूहीची आंध्र प्रदेश सरकारने ग्रुप 1 अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पी.व्ही.सिंधूला उपजिल्हाधिकारीपदाचे ऑफर लेटरही दिले आहे. याआधीही ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्याबद्दल खूप बक्षीसांचा वर्षाव पी.व्ही.सिंधूवर झाला आहे. तिला उपजिल्हाधिकारी पदाचे ऑफर लेटर दिल्यावर नायडू यांनी ट्विट करून पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत. तर सिंधूनेही ट्विट करून त्यांचे आभार मानले आहे. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने सिंधूला 3 कोटी रूपये, अमरावतीत एक प्लॉट आणि उपजिल्हाधिकाऱ्याची नोकरी देण्याचं वचन दिले होते.