सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जुलै 2022 (12:54 IST)

Commonwealth Games:नीरज चोप्रा राष्ट्रकुल 2022 स्पर्धेतून बाहेर, भारताला मोठा धक्का

Neeraj Chopra
28 जुलैपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. याच्या दोन दिवसांपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडले आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता यांनी ही माहिती दिली.
 
अलीकडेच नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. अंजू बॉबी जॉर्ज (2003) नंतर असे करणारा तो दुसरा खेळाडू ठरला. मात्र, त्याच स्पर्धेत त्याला दुखापतही झाली. नीरज चोप्राला जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीच्या अंतिम सामन्यात दुखापत झाली होती. फायनलमध्ये नीरजही मांडीला पट्टी बांधताना दिसले.
 
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरज म्हणाले  - चौथ्या थ्रोनंतर मला मांडीत अस्वस्थता जाणवत होती. चौथ्या थ्रोनंतर मला पाहिजे तितके जोरात धक्का मारता आला नाही. नीरजच्या या वक्तव्याने तमाम देशवासियांची चिंता वाढली होती. 
 
राष्ट्रकुलमध्ये स्पर्धा कमी आणि पदक जिंकण्याची शक्यता जास्त असते. अशा स्थितीत नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्याचे मानले जात होते, मात्र त्याच्या दुखापतीमुळे भारताचे पदक गमावले आहे. 
 
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेनंतर, नीरज चोप्राचा एमआरआय स्कॅन करण्यात आला, ज्यामध्ये ग्रोईंन इंज्युरी ची बाब आढळून आली. अशा परिस्थितीत नीरज चोप्राला  जवळपास एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यामुळेच तो 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोप्राचा सामना 5ऑगस्ट रोजी होणार होता, त्याच दिवशी भालाफेक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आता या क्षेत्रात भारताच्या आशा आशा डीपी मनू आणि रोहित यादव यांच्याकडून आहेत. आता हे दोघेही भालाफेकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.