German Open Badminton: लक्ष्य सेनला विजेतेपदाचा सामना गमवावा लागला
जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनला जर्मन ओपन सुपर 300 स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याला विजेतेपदाच्या लढतीत थायलंडच्या कुनलावत विदितसार्नकडून पराभव पत्करावा लागला. लक्ष्यचा 18-21, 15-21 अशा सरळ सेटमध्ये पराभव झाला.
भारताचा बॅडमिंटनपटू, 20 वर्षीय लक्ष्य याने यापूर्वी उपांत्य फेरीत चांगला खेळला होता. भारतीय खेळाडूने टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला डेन्मार्कचा खेळाडू व्हिक्टर एक्सेलसेनचा 21-13, 12-21, 22-20 असा चुरशीच्या लढतीत पराभव केला.