Asian Champions Trophy Hockey: भारताची हॉकीमध्ये विजयी हॅट्रिक
भारताने रविवारी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Asian Champions Trophy) जपानचा 6-0 ने दारूण पराभव केला आहे. लागोपाठ तिसरा विजय मिळवत भारतीय टीम स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे.
अशा प्रकारे भारताची विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण झाली
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघ शानदार स्थितीत आहे. मात्र, पहिल्या सामन्यात संघाची सुरुवात फारशी खास राहिली नाही आणि त्यांना दक्षिण कोरियाविरुद्ध 2-2 अशी बरोबरी पत्करावी लागली. मात्र, त्यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली. दुसऱ्या सामन्यात भारताने यजमान बांगलादेशचा 9-0 अशा मोठ्या फरकाने पराभव केला. यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताने शेजारी देश पाकिस्तानचा ३-१ असा पराभव केला. आता रविवारी जपानविरुद्ध संघाने पुन्हा एकदा चमक दाखवत शानदार विजय मिळवला.