शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 (18:02 IST)

भारतीय हॉकी संघाने चीनला हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले

भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या अंतिम फेरीत चीनचा 1-0 ने पराभव केला. या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांकडून एकही गोल करण्यात यश आले नाही. त्यानंतर सामना संपण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी जुगराज सिंगने भारतासाठी गोल केला.या गोलमुळेच भारतीय हॉकी संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. भारताने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे.

भारताने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते. चीनने प्रथमच फायनलमध्ये प्रवेश केला होता आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांचा पराभव झाला होता. 
 
याआधी उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाने कोरियाचा 4-1 असा पराभव केला होता. उपांत्य फेरीत कोरियन संघाविरुद्ध हरमनप्रीत सिंग, उत्तम सिंग आणि जर्मनप्रीत सिंग यांनी गोल केले.
 
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंना गोल करण्यात अपयश आले. भारताने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या, मात्र गोल करण्यात संघाला यश आले नाही. भारताला पेनल्टी कॉर्नरही मिळाला. 
दुसऱ्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नाही. या क्वार्टरमध्ये चीनच्या बचावफळीने चांगली कामगिरी करत भारतीय खेळाडूंना रोखून धरले.

तिसऱ्या क्वार्टरपर्यंत दोन्ही संघांमध्ये एकही गोल झाला नाही. यानंतर जुगराज सिंगने उत्कृष्ट मैदानी गोल करत संघाला सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली

भारतीय हॉकी संघाने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी, भारताने 2011, 2016, 2018 (पाकिस्तानसह संयुक्त विजेते) आणि 2023 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केल्याबद्दल हरमनप्रीत सिंगला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाला आहे. 
Edited by - Priya Dixit