रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लंडन , सोमवार, 22 मे 2017 (12:01 IST)

वाईल्ड कार्डसाठी निवंती नाही - शरापोव्हा

आगामी विंबल्डन स्पर्धेसाठी वाईल्ड कार्ड मिळावे म्हणून विनंती करणार नसल्याचे रशियाची वादग्रस्त टेनिसपटू मारिया शारापोव्हाने स्पष्ट केले. पात्रता फेरीत खेळू असेही तिने आपल्या संकतस्थळावर म्हटले आहे. जागतिक क्रमवारीतील स्थानानुसार शारापोव्हाला या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळू शकणार नाही. शारापोव्हा 211 व्या स्थानावर आहे. स्पर्धेतील प्रवेशासाठी असलेल्या अंतिम मुदतीपर्यंत तिचे स्थान पुरेसे वर नव्हते. त्यामुळे वाईल्ड कार्ड किंवा पात्रता स्पर्धेतील सहभाग असे दोनच पर्याय तिच्यासमोर होते. यापार्श्वभूमीवर तिने खुलासा केला आहे. विंबल्डनची पात्रता स्पर्धा रोहॅम्पटन येथे होते. तसेच मारीया शारापोव्हाने आपले लढण्याचे मनसुबे स्पष्ट केले आहेत.