रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

ऑस्ट्रेलियन ओपन: टेनिसस्टार रॉजर फेडरर विजेता

रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावर जिंकले आहे. यामध्ये त्याने पाच सेट्सच्या झुंजीनंतर राफेल नदालचंचा पराभव केला आहे. रॉजर फेडररने राफेल नदालचं कडवं आव्हान 6-4, 3-6, 6-1, 3-6, 6-3 असं सेट मध्ये विजय मिळविला आहे. 

रॉजर फेडररचं ऑस्ट्रेलियन ओपनचं हे पाचवं आणि कारकीर्दीतलं हे अठरावं विजेतेपद ठरलं आहे.फेडरर आणि नदालमधला हा सामना तीन तास आणि 37 मिनिटं चालला.याआधी दोघांमध्ये झालेल्या तीन्ही लढतीत नदालनं फेडररवर विजय मिळवला होता.