गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लिस्बन , शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (16:38 IST)

रोनाल्डोची सोशल मीडियावर भन्नाट कामगिरी

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मैदानाबाहेर आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. सोशल मीडियावर 500 मिलियन फॉलोअर्स असणारा तो जगातील पहिला व्यक्ती ठरला आहे. रोनाल्डोचे इन्स्टाग्रावर 261 मिलियन, फेसबुकवर 125 मिलियन आणि टि्वटरवर 91 मिलियन फॉलोअर्स आहेत. टि्वटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणार्या सेलिब्रिटीजमध्ये रोनाल्डो अव्वल आहे. रोलाल्डोने नुकताच आपला 36 वा वाढदिवस साजरा केला.
 
आपल्या कारकिर्दीत त्याने 5 चॅम्पियन लीग, 2 ला लीगा, 3 प्रीमियर लीग, 2 सिरी ए असे 30 पेक्षा अधिक किताब पटकावले आहेत. त्याने आपल्या फुटबॉल कारकिर्दीत 5 वेळा बलून डी ओर पुरस्कारही मिळवला आहे. काही दिवसांपूर्वी नेपोलीविरुद्ध सामना खेळताना जुव्हेंटसच्या रोनाल्डोने विश्वविक्रम केला. या विक्रमाद्वारे रोनाल्डो फुटबॉलच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. रोनाल्डोच्या खात्यात आता 760 गोल झाले आहेत. त्याने जोसेफ बिकनच्या 759 गोलच्या विक्रमाला मागे टाकले. स्पॅनिश फुटबॉल क्लब रियलमाद्रिदसाठी रोनाल्डोने सर्वाधिक 311 गोल केले आहेत. याव्यतिरिक्त त्याने मॅन्चेस्टर युनायटेडसाठी 84, स्पोर्टिंग सीपीसाठी 3 आणि जुव्हेंटसकडून 67 गोल केले आहेत.
 
पोर्तुगाल संघासाठी रोनाल्डोने 170 सामन्यात 102 गोल केले आहेत. तो पोर्तुगालच्या अंडर-15, अंडर-17, अंडर-20, अंडर-21 आणि अंडर-23 संघातही खेळला आहे.