भारतीय खेळाडूंचा पहिला संघ टोकियो पोहोचला
ऑलिम्पिक मध्ये स्थान मिळवण्याच्या उद्देशाने पहिला 88 सदस्यीय भारतीय संघ रविवारी सकाळी 23 जुलैपासून होणाऱ्या खेळांसाठी टोकियो येथे दाखल झाला.कोव्हीड -19 साथीच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या खेळांसाठी आर्चरी,बॅडमिंटन,टेबल टेनिस,हॉकी,ज्युडो,जिम्नॅस्टिक,जलतरण आणि वेटलिफ्टिंग यासह आठ भारतीय खेळांचे खेळाडू,सहाय्यक कर्मचारी आणि अधिकारी नवी दिल्लीहून विशेष विमानाने जपानच्या राजधानीत दाखल झाले. पहिला संघ 88 सदस्यांचा आहे,ज्यात 54 खेळाडूंचा समावेश आहे, तसेच सपोर्ट स्टाफ आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी (आयओए) समाविष्ट आहेत.
विमानतळावर कुरोबे शहराच्या प्रतिनिधींनी भारतीय खेळाडूंचे स्वागत केले. त्यांच्या हातात बॅनर होती ज्यात असे लिहिले होते की, कुरोबे भारतीय खेळाडूंना पाठिंबा देतात.# चीअर्स 4 इंडिया.' हॉकीमध्ये पुरुष आणि महिला हॉकी संघ समाविष्ट आहे .कोणत्याही एका खेळामधील हा भारताचा सर्वात मोठा संघ आहे. यापूर्वी शनिवारी रात्री क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर भारतीय खेळाडूंना टाळ्याच्या गर्जनात आणि शुभेच्छा देऊन निरोप दिला.
विमानतळावर एक अनपेक्षित दृश्य दिसले.ऑलिम्पिकच्या संघासाठी रेड कार्पेट घालण्यात आले होते.खेळाडूंच्या जाण्याविषयी इतका उत्साह होता की भारत सरकारने या सदस्यांच्या कागदाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती.
ठाकूर यांच्या व्यतिरिक्त क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रमाणिक ,भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान,आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि सरचिटणीस राजीव मेहता यांनीही निरोप समारंभात भाग घेतला. भारतीय खेळाडूंपैकी काही जण परदेशातील सराव ठिकाणांवरून टोकियो येथे पोहोचले आहेत.
अमेरिकेतील सेंट लुईस येथील प्रशिक्षण मैदानातून भारताची एकमेव वेटलिफ्टर मीराबाई चानू शुक्रवारी टोकियो येथे दाखल झाली. इटली आणि क्रोएशियामधील सराव साइटवरून बॉक्सर आणि नेमबाज येथे दाखल झाले आहेत.
ऑलिम्पिकमध्ये 119 खेळाडूंचा समावेश असणारी भारताची 228 सदस्यीय पथके सहभागी होतील.भारतातील पहिले चार भारतीय नाविक हे नेत्र कुमानन आणि विष्णू सरवनन (लेझर क्लास),के.सी.गणपती आणि वरुण ठक्कर (49 ER वर्ग) युरोपमधील प्रशिक्षण स्थळांवरून टोकियोला पोहोचले. त्यांनी गुरुवारी सरावही सुरू केला आहे. या शिवाय रोइंग टीम देखील टोकियो येथे पोहोचली आहे.