शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जुलै 2021 (16:43 IST)

टोकियो ऑलिम्पिकः टोकियोमध्ये आणीबाणी लागू केल्यामुळे लोक ऑलिम्पिक संबंधित उत्सव साजरा करू शकणार नाहीत

ऑलिम्पिक खेळ सुरू होण्यास अजून काही दिवस शिल्लक आहेत, पण टोकियोमध्ये कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे आयोजकांची चिंता वाढली आहे. हेच कारण आहे की 11 दिवसांपूर्वी, सोमवारपासून जपानच्या राजधानीत आणीबाणी ची स्थिती लागू करण्यात आली होती.सहा आठवड्यांची ही आणीबाणी 22 ऑगस्टपर्यंत लागू राहील. 
 
साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून टोकियोमध्ये चौथ्यांदा आपत्कालीन परिस्थिती लागू करण्यात आली आहे. बार आणि रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या  दारूवर बंदी घालणे हे नवीन आणीबाणीचे मुख्य उद्दीष्ट आहे कारण लोकांनी सार्वजनिकरित्या गर्दी करण्या ऐवजी घरातच राहावे आणि दूरदर्शनवर खेळांचा आनंद घ्यावा अशी अधिकाऱ्यांची इच्छा आहे.
 
आणीबाणीच्या वेळी उद्याने,संग्रहालये, चित्रपटगृहे आणि बहुतेक दुकाने आणि रेस्टारंट रात्री 8 वाजता बंद करण्याची विनंती केली आहे.टोकियोच्या रहिवाशांनाअनावश्यक वस्तूं खरेदीसाठी बाहेर पडण्यापासून टाळण्यासाठी व घरून काम करण्याची विनंती केली आहे. लोकांना मास्क घाला आणि इतर सुरक्षा उपायांचा अवलंब करण्यास सांगितले गेले आहे.
 
 या आणीबाणीचा परिणाम टोकियोमधील 14 दशलक्ष लोकांना तसेच चिबा, सैतामा आणि कानगावासारख्या जवळील शहरांतील 31 दशलक्ष लोकांना होणार आहे.ओसाका आणि दक्षिणद्वीप ओकिनावा या ठिकाणी देखील आणि बाणींच्या उपायांची अंमलबजावणीही झाली आहे.
 
स्टेडियममध्ये चाहत्यांच्या अनुपस्थितीमुळे याचा 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिकवरही चांगला परिणाम होणार आहे.नवीन निर्बंधांमुळे चाहते हे खेळ केवळ टेलिव्हिजनवर पाहण्यास सक्षम असतील.
 
शनिवारी टोकियोमध्ये कोविड 19 संसर्गाचे 50 रुग्ण आढळले आहेत, जे गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक आहेत.जपानने मात्र इतर देशांपेक्षा या विषाणूचा चांगला सामना केला आहे. तेथे सुमारे 8.20लाख प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यातील मृत्यूमुखी असणाऱ्यांची संख्या 15,000आहे. सर्वात मोठी चिंता म्हणजे टोक्योमधील लोक वारंवार आणीबाणीच्या त्रासाने कंटाळले आहेत आणि यामुळे ते सरकारला सहकार्य करीत नाहीत. रात्री 8 नंतर मोठ्या संख्येने तरुण रस्त्यावर आणि उद्यानात जमत आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी रात्रीची गस्त सुरू केली आहे.तज्ञाच्या मते,जर आणीबाणी लागू केली नाही तर या व्हायरसचा प्रसार अधिक होऊ शकतो.