शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By वेबदुनिया|

'गजिनी',टर्निंग पॉइंट- जिया

WDWD
बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन व रामगोपाल वर्मा या दिग्गजांसोबत काम करूनही जिया खानला पाहिजे तसे यश मिळवता आले नाही. 'नि:शब्द' बॉक्स ऑफिसवर आपटली गेला आणि जियाला कित्येक महिने घरीच पडून राहावे लागले. जियाला आमिर खानसारख्या महान कलाकारासोबत काम करायला मिळत असल्याने ती स्वत:ला खूप भाग्यशाली समजत आहे. जियाच्या करियरला 'गजिनी'च आकार देणार असल्याने तिला या चित्रपटापासून खूप अपेक्षा आहेत. गजिनी'मधील भूमिकाविषयी जियाशी केलेली बातचित....

'गजिनी'च्या प्रचारकार्यात तुझी जास्त चर्चा नाही, याचे कारण?
मी चित्रपटाचा एक भाग आहे. मी प्रचारकार्यात का नाही? याचे उत्तर आमिर खान व चित्रपट निर्माता माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे दे‍तील. माझी भूमिका मात्र प्रेक्षकांना 'धक्का' देणारी ठरणार हे नक्की!

पहिला अमिताभ बच्चन व दूसरा आमिर खानसोबत चित्रपट करताना तुला केसे वाटते?
दोघेही अनुभवी कलाकार आहेत. जेव्हा इतक्या महान कलाकारांसोबत काम करायचे काय तर त्याच वजनाचा परफॉर्म करावा लागतो. त्यांच्यासोबत काम करताना मला खूप काही शिकायला मिळाले आहे.

आमिरपासून तू काय शिकली?
'गजिनी'मध्ये माझे नाटकी दृश्य आहेत. एका अभिनेत्रीच्या रूपात 'गजिनी'च्या तुलनेत 'नि:शब्द' साकारणे माझ्यासाठी काही कठीन नव्हते. मात्र आमिरसोबत काम करताना त्याच्यावर मोठ्याने ओरडणे, रागवणे माझ्यासाठी खूप कठीण होते. आमिरने मला खूप मदत केली. सराव करताना आम्ही खूप विचारपूर्वक अभिनय करत होते. मला आमिरकडून खूप काही शिकायला मिळले आणि माझ्या करियरसाठी त्याचा खूप फायदा होणार आहे.

WDWD
'गजिनी'मध्ये कुठल्या कारणावरून तुझी निवड झाली?
माझी प्रतिभा हेच त्याच्या मागील एकमेव कारण आहे. मला चित्रपट निर्मात्याकडून ऑफर मिळाली होती. तेव्हा आमिर खान चित्रपरटाशी चांगलाच जुडला होता. आमिर असल्याने चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा अधिक बळावली होती. माझी ऑडिशन टेस्ट घेतली गेली. त्यानंतर मला खूप वाट बघावी लागली. ऑडिशनच्या दोन आठवड्यानंतर मला सूचना मिळाली की, चित्रपटासाठी माझी निवड झाली आहे. तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता.

'गजिनी'तील तुझ्या भूमिकेविषयी सांग?
मी यात सुनीता नामक मेडिकल स्टूडेंट भूमिका साकारत आहे. ब्रेन स्टडी तिचा आवडता विषय आहे. आमिरच्या केसवर ती अध्ययन करते व त्याच्याबाबत सर्व माहिती मिळवून त्याची मदत करते.

'गजिनी'त तुला अभिनय करताना अडचणी आल्यात?
आमिर अथवा अमिताभ सारख्या कलाकारासोबत काम करताना जास्त तनाव निर्माण होतो. आपण त्याला जास्त रीटेक देऊ शकत नाही. आपल्याला आपले काम साचेबंद व चोख करावे लागते.

'गजिनी'च्या माध्यमातून तुला यशाचे गोड फळ चाखण्यास मिळेल असे वाटते काय?
'गजिनी' एक थ्रिलर व कमर्शियल चित्रपट आहे. मला या चित्रपटापासून खूप अपेक्षा आहेत. 'गजिनी' माझ्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.

असीनसोबत ही तुझे काही दृश्य आहेत?
नाही. असीनची भूमिका मध्यांतराआधी व माझी त्यानंतर आहे.

'नि:शब्द'मध्ये तुझे सेक्सी रूप प्रेक्षकांना दिसले, गजिनीत तुझा लुक तसाच आहे?
नाही, 'गजिनी'त मी स्वत:ला डोक्यापासून पायापर्यंत झाकून ठेवले आहे.