सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. अर्थसंकल्प 2023-24
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (18:49 IST)

Income Tax Slab Update : मोदी सरकार करू शकते 5 लाखांपर्यंत आय करमुक्त!

Budget 2023
केंद्रातील मोदी सरकार 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आपला शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्प 2023 मध्ये करदात्यांना मोठी भेट दिली जाऊ शकते असे समजते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सरकारने यंदाच्या अर्थसंकल्प 2023-24 मध्ये आयकर स्लॅबमध्ये बदल करण्याची तयारी केली आहे. रॉयटर्सने पंतप्रधान कार्यालयातील दोन सरकारी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. सूत्रांची नावे जाहीर न करता, एजन्सीने लिहिले आहे की यावेळी आयकर सवलत मर्यादा 2.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली जाऊ शकते. या प्रकरणी रॉयटर्सने पाठवलेल्या ईमेलला अर्थ मंत्रालयाने प्रतिसाद दिला नाही.
 
 त्याच वेळी, बरेच लोक असेही म्हणत आहेत की आयकर दर आणि स्लॅब जे मूल्यांकन वर्ष 2022-23 मध्ये लागू होते, ते नवीन मूल्यांकन वर्षात (AY 2023-24) देखील लागू राहू शकतात. तुम्हाला सांगतो की अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Edited by : Smita Joshi