शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: शनिवार, 27 सप्टेंबर 2014 (09:30 IST)

आमदार संभाजी पवार यांची भाजपला सोडचिठ्ठी

सांगली- भाजपचे आमदार संभाजी पवार यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला हादरा दिला आहे. आमदार पवार यांनी भाजपला सोडचिठ्ठीा देऊन त्यांना शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
 
भाजपने महाराष्ट्र तोडण्याचे काम भाजपा करीत आहे. भाजपमध्ये पैसे घेवून उमेदवारी दिली जाते. असा घणाघात आरोपही संभाजी पवार केला आहे. 
 
राष्ट्रवादी बरोबर भाजपाची छुपी युती असल्याचा आरोप करून मोठी खळबळ उडाली आहे. तसेच यावेळी संभाजी पवारांनी मुंडे समर्थकांना उमेदवारी डावलण्याचे काम भाजपा नेत्यांनी चालवले असल्याचाही गंभीर आरोप केले आहेत.
 
भाजपामध्ये सध्या मुंडे समर्थकांना उमेदवारी न देण्याचे काम भाजपा नेत्यांनी केले आहे. बहुतांशी राष्ट्रवादीचे आमदार मंत्री भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. याचाच अर्थ भाजपा आणि राष्ट्रवादीची ही मिलीभगतच आहे अशी गंभीर टीकाही भाजपचे जेष्ठ नेते आमदार संभाजी पवार यांनी भाजपा नेत्यांवर केली आहे.