नरेंद्र मोदींकडून सरकारी यंत्रणेचा वापर- राज ठाकरे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून राज्यात सभा घेत असून त्यांच्याकडून सरकारी यंत्रणेचा वापर होत असल्याचे आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. मात्र, याकडे निवडणूक आयोग का दुर्लक्ष करीत आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
राज ठाकरे ठाणे आणि भिवंडीतील सभेत संबोधित करत होते. या सभेत राज यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. एरवी आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाचे व्हिडीओग्राफर उमेदवारांच्या मागे मागे जातात. पण मोदी यांच्याकडून राज्यात भाजपच्या प्रचारासाठी सरकारी विमाने, हेलिकॉप्टर आदी यंत्रणा वापरली जात असताना त्याचा जाब का विचारला जात नाही, असा बोचरा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.