शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: अमरावती , मंगळवार, 30 सप्टेंबर 2014 (15:49 IST)

मुख्यमंत्री म्हणजे दिल्लीहून आणलेले बुजगावणे- राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर चौफेर फटकेबाजी केकली. राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे दिल्लीहून आणलेले बुजगावणे असल्याचे सांगून राज यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची खिल्लीही उडवली. राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) अमरावतीतील दर्यापूर येथील  जाहीर सभेत संबोधित केले. 
 
बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱयांच्या आत्महत्या या गोष्टींमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याची टीका राज यांनी यावेळी केली.  सभेत पुन्हा एकदा राज यांनी आपल्या 'ब्लू प्रिंट' मधील मुद्द्यांवर भर देताना राज्यात सत्ता आल्यास सरकारी सुरक्षा एजन्सी उभारणार असल्याचे म्हटले. हाती सत्ता द्या राज्यातील सर्व तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, पोलीस भरतीच्या प्रक्रियेत बदल करणे आणि ज्याठिकाणी पिकते त्याठिकाणीच कारखाने उभारणे या अशा आणि इतर सर्व विकासाच्या योजना माझ्याकडे तयार आहेत. फक्त माझ्या बाजूने एकदा कौल द्या असे आवाहनही राज यांनी उपस्थितांना केले.