मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योग सल्ला
Written By वेबदुनिया|

पृथ्वी मुद्रा

WDWD
मुद्रांमध्ये पृथ्वी मुद्रेचे खूप महत्व आहे. आपल्यात असलेले पृथ्वी तत्व त्या माध्यमातून जागृत होत असते. शरीरातील दोन नाड्यांमधील एक सूर्यनाडी व दूसरी चंद्र नाडी असते. पृथ्वी मुद्रा करताना अंगठ्याने अनामिकेला म्हणजेच सूर्य बोटावर दाब दिला जातो. त्यामुळे सूर्य नाडी व स्वर सक्रिय होण्यास सहकार्य मिळत असते.

पद्धत - तर्जनीला अंगठ्याने स्पर्श करून दाब द्या. बाकी उर्वरित तीन बोटांना सरळ ताठ करून ठेवावे. पुथ्वी मुद्रा आपल्याला कुठेही व कुठल्याही क्षणी करता येते.

फायदा - पृथ्वी मुद्रा केल्याने सर्व प्रकारचा थकवा नाहीसा होतो. वजन वाढते. चेहरा व त्वचा स्वच्छ तसेच चमकदार बनते. पुथ्वी मुद्रा शरीरा नेहमी फिट ठेवत असते.