मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योग सल्ला
Written By वेबदुनिया|

सौंदर्य आणि योगासन!

अमिता शाह

ND
ND
आपण सुंदर दिसावं, आपल्या लावण्याचे समोरच्याने कौतुक करावे, एवढेच नाही तर समोरचा आपल्याला पाहताक्षणी घायाळ व्हावा, असे जगातील प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. सुंदर दिसण्यासाठी ती बाजारात उपलब्ध असलेल्या सौंदर्य प्रसाधनांची मदत घेत असते. त्याने फायदा कमी व नुकसान जास्त होण्याची भीती नाकारता येत नाही.

चेहर्‍याच्या मेकअपपासून तर डोक्यावरील केस रंगविण्यासाठी अनेक कॉस्मेटीक्सचा वापर महिला करताना दिसत असतात. मात्र यापासून मिळणारे सौंदर्य हे क्षणिक असते, हे त्या विसरतात. योगासन व निसर्गोपचार ही दोन साधने महिलांचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी वरदान ठरल्याचे सिध्द झाले आहे.

काय करावे-
आपल्या धावत्या जीवनातून दररोज 20-25 मिनिटे योगासनासाठी काढावीत. नियमित योग केल्याने त्वचा सतेज तर होतेच शिवाय आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबीही कमी‍ होते. योगाभ्यास केल्यानंतर ताठ उभे रहावे. आपल्या चेहरा दोन्ही हातानी झाकून टाकावा. नंतर मोठ्याने श्वास घ्यावा. त्यानंतर डोक्याची चांगली मालीश करावी. हाच क्रम तीन वेळा करावा. याबरोबर कपालभाती व अनुलोम विलोम केल्याने अधिक लाभ होतो.

सुडौल मान-
काही महिलांची मान ही प्रमाणापेक्षा जास्त जाड असते. ही जाडी कमी करण्यासाठी दोन्ही पाय जवळ करून उभे रहावे. चेहरा वरच्या बाजुने जितका नेता येईल तितका न्यावा. काही काळ अशाच स्थितीत ठेऊन नंतर मान हळू हळू खाली आणून आपली हनवटी छातीला लावाण्याचा प्रयत्न करावा. नंतर ताठ उभे राहून खांदे न हालवता डोके दोन्ही बाजूस हलवावे. हे आसन किमान 20 वेळा करावे.

थोडे पाय पसरवून उभे रहावे. हात कमरेवर ठेवा. श्वास जोरात घ्यावा व जोरातच सोडावा. ही कसरत किमान 40 वेळा करावी. हळू हळू त्यात वाढ करून 100 पर्यंत करता येईल. पाय पुढे सरकवून खाली बसावे. दोन्ही हात समान वर उचला व खाली आणा. सुरवातीला ही कसरत 50 वेळा करावी.

पोटावरील चरबी कमी करण्‍यासाठी-
पाय पसरवून उभे रहा. गुडघ्यात न वाकता पायाची बोटे हाताच्या बोटांनी पकडण्याचा प्रयत्न करावा. सुरवातीला ते जमणार नाही परंतु नियमित केल्याने ते शक्य होईल. दररोज हे आसन 10 वेळा करावे.

पाय दोन फुटापर्यंत पसरवून शरीराला पुढच्या बाजुला 90 अंशांच्या कोणात झुकवा. उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करावा. नंतर डाव्या हाताच्या बोटाने उजव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करावा. ही क्रिया किमान 20 वेळा करावी.

जमिनीवर सरळ ताठ झोपावे. पाय जवळ करून घ्यावेत. आता पाय न वाकवता उठण्याचा प्रयत्न करावा. अशाच प्रकारे कमरेपासून पाय व डोके, पाठ वर उचलण्‍याचा प्रयत्न करावा. या स्थितीत शरीराची आकृती एका नावेप्रमाणे होईल. या स्थितीत साधारण 1 मिनिट रहावे. याशिवाय आपण पश्चिमोत्तनासन करून पोट व कंमरेरील अतिरिक्त चरबी कमी करू शकता. पवनमुक्तासन, भुजंगासन, धनुर्रासन आसनेही तुम्ही सहज करू शकता.

मनाचे सौंदर्यही महत्त्वांचे-
मन शांत असेल तरच तन सुंदर राहते. मनात भीती असेल तर ती आपल्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवते. आपला चेहरा ओढला जातो. अनुलोम विलोम, कपालभाती तसेच श्वासाची कसरत केल्याने मनाचे सौंदर्यही अबाधित रहाते.