रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (08:56 IST)

Yoga for Sharp Mind मुलांनी तीक्ष्ण बुद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठी या चार योगासनांचा सराव करावा

बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार आहे. मुलांना जस जसं परीक्षेचा काळ जवळ येत असला तर त्यांना भीती वाटते. अनेक मुले शारीरिक आणि मानसिक दृष्टया परीक्षेसाठी तयार नसतात. मुलांचे मन स्थिर करण्यासाठी त्यांची बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी आणि परीक्षाकाळात त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही योगासन आहेत. यांचा सर्व नियमित केल्याने त्यांची स्मरणशक्ती वाढेल. चला तर मग जाणून घेऊ या या योगासनांबद्दल. 

1 ताडासन -एकाग्रता वाढविण्यासाठी - अभ्यासात एकाग्रता आवश्यक आहे. मुलांचे मन एकाग्र करण्यासाठी ताडासन योगाचा सराव करावा. या मुळे मुलांची श्वास घेण्याची क्षमता वाढते. ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत होते. मुलांची उंची देखील वाढते.
 
2 वृक्षासन- तणाव कमीकरण्यासाठी - मुलांना परीक्षेदरम्यान ताण येऊ शकतो. दुसरीकडे दिवसभर बसून अभ्यास केल्यानेही त्याच्या शरीरात वेदना होतात. अशा परिस्थितीत, वृक्षासन योगाचा अभ्यास मानसिक शांतीसाठी म्हणजे तणाव कमी करण्यासाठी आणि शरीरातील वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मुलांनी सकाळी वृक्षासन योगाचा सराव करावा.
 
3 अधोमुखश्वानासन - अधोमुखश्वानासनाच्या सरावाने आळस दूर होतो, शरीरात लवचिकता येते. उत्साह वाढतो आणि आळस दूर होतो. हे आसन केल्याने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. यामुळे मुलांचे हात-पाय मजबूत होतात. कधीकधी मुलांना अभ्यास करताना झोप येते. या आसनामुळे त्याच्या डोक्यात रक्ताभिसरण वाढते, ऑक्सिजन योग्य पद्धतीने मेंदूपर्यंत पोहोचतो आणि एकाग्रता वाढते. 
 
4 धनुरासन- कंबर आणि पाठदुखीपासून आराममिळण्यासाठी - मुले सतत अभ्यास करतात तेव्हा त्यांना दिवसभर बसावे लागते. त्यामुळे त्याच्या पाठीवर दाब येतो. कंबर आणि पाठदुखीचीही शक्यता असते. पण धनुरासनाच्या सरावाने मुलांची पाठ मजबूत होते. त्यांच्या हाताच्या आणि पाठीच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो आणि शरीरात लवचिकता येते.