गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मे 2021 (17:21 IST)

हातांची चरबी कमी करण्यासाठी हे व्यायाम करा

जर शरीराचा एखादा भाग खूपच चरबीचा असेल तर शरीर विचित्र दिसते. म्हणूनच संपूर्ण शरीर तंदुरुस्त राहणे फार महत्वाचे आहे. बर्‍याच स्त्रिया हाताच्या लठ्ठपणामुळे खूपच अस्वस्थ असतात पण काही वेळ व्यायाम केल्यावर या लठ्ठपणावर मात करता येतं. 
 
1 मनगट फिरवा - आपल्या हाताला पुढे करून घट्ट मूठ बांधा. पाय खांद्याच्या प्रमाणे ठेवा. 15 वेळा मनगटांना घड्याडीच्या काट्याच्या दिशेने आणि आणि 15 वेळा उलट फिरवा. असं 5 -7 वेळा करा. नियमितपणे हा व्यायाम करा. शक्यतो हा व्यायाम  दररोज एकाच वेळी करा. 
 
2 स्ट्रेचिंग करा - हातांना स्ट्रेच करणे आपल्यासाठी फायदेशीर होऊ शकतं.हे कोणत्याही वेळी केले जाऊ शकते. डोक्याच्या मागील बाजूस हाताच्या बोटांना इंटरलॉक करून त्यांना स्ट्रेच करा. या दरम्यान लक्षात ठेवा की  कोपरे डोक्याच्या मागे असावे. एकीकडे शरीराला वाकवा, कंबरेत ताण आणत दुसरी कडे वाकवा.
 
3 दोरीच्या उड्या घ्या - दोरीच्या उड्या करून देखील आपण हाताची चरबी कमी करू शकता. दोरी उड्या केल्याने आपल्याला घाम येतो आणि वजन देखील कमी होते. दोरीच्या उड्या करताना हात गोलाकार फिरतात या मुळे त्यांचा चांगला व्यायाम होतो. तसेच  अतिरिक्त चरबी देखील दररोजच्या सरावाने कमी होऊ लागते.