Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रतिकारक शक्ती वाढवून तणाव कमी करतात हे योगासन

Updated: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (17:02 IST)
 
1 धनुरासन -
 
हे आसन करण्यासाठी शरीराला धनुष्याच्या आकारात दुमडतात.दररोज धनुरासन केल्यानं प्रतिकारक शक्ती बळकट होते आणि शरीर ताजेतवानं राहतो.या मुळे तणाव कमी होऊन आत्मिक शांती आणि आनंद मिळतो. हे आसन करण्यासाठी जमिनीवर चटई अंथरून पोटावर झोपा. नंतर पायाला मागे दुमडून दोनी हाताने धरून ठेवा दीर्घ श्वास घेत छाती आणि पायाला हळू हळू वर उचला चेहरा समोर ठेवून पायाला आपल्या सामर्थ्यानुसार हाताने ओढा आपल्याला धनुष्याचा आकार बनवायचा आहे. काही वेळ त्याचा अवस्थेत राहून पुन्हा सामान्य स्थितीत या. 
 
3  ब्रिज पोझ - हे आसन जमिनीवर पाठीवर झोपून करायचे आहे. हे आसन तणाव कमी करून रक्तदाब नियंत्रित करतो.थॉयराइड असलेल्या रुग्णांसाठी हे आसन करणे फायदेशीर आहे. हे करण्यासाठी पाठीवर झोपा हात आणि खांदे सरळ जमिनीवर ठेवा. पायावर जोर देत आपल्या शरीराचे संपूर्ण भार टाका. शरीराला हळुवार उचलत गुडघे वरील बाजूस करा. या अवस्थेत 4 ते 5 सेकंद राहून दीर्घ श्वास घ्या नंतर सामान्य अवस्थे मध्ये येऊन या आसनाची पुनरावृत्ती करा.
 
3 वृक्षासन-
हे आसन करणे फायदेशीर आहे या मुळे स्नायूंना आणि हाडांना मजबूती मिळते. पाठीचा कणा बळकट होतो.प्रतिकारक शक्ती बळकट होते. शरीरात संतुलन राहून तणाव कमी होते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा एक गुडघा दुमडून पायाला दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवून संतुलन बनवा नंतर हाताला डोक्याच्या वर घेऊन जाऊन नमस्काराची मुद्रा करा. उभे राहून दीर्घ आणि  लांब श्वास घ्या. काही वेळ याच अवस्थेत राहून पुन्हा सामान्य अवस्थेमध्ये या. अशा प्रकारे दुसऱ्या पायाने देखील हे आसन करा.
हे आसन केल्याने आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढेलच तसेच तणाव देखील कमी होण्यात मदत मिळेल

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेपासून मिळवा आराम! रोजच्या आहारात ‘ही’ भाजी नक्की खा

पतीचा फोन तपासणे योग्य की अयोग्य? नात्यातील विश्वास आणि गोपनीयतेशी संबंधित ‘या’ गोष्टी जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : आपण काय करू शकत नाही?

Raksha Bandhan Wishes for Brother in Marathi 2026 भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

फाउंडेशन लावताना या ५ चुका करताय? मेकअपचा संपूर्ण लुक बिघडण्याआधी हे नक्की वाचा!

पुढील लेख
Show comments