बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. ख्रिश्चन
  4. »
  5. ख्रिश्चन धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

येशू

WD
ख्रिश्चन धर्माचे संस्थापक प्रभू येशू यांचा जन्म २००० मध्ये इस्त्रायलमधील बेथेलहेम येथे झाला. या वर्षापासून खर्‍या अर्थाने कालगणना सुरू झाल्याचे मानले जाते. (इंग्रजी कालगणनेतील बीसी म्हणजे ख्रिस्त जन्मापूर्वीचा काळ व एडी म्हणजे देवाचे वर्ष).

मेरी ही येशूची आई. येशूच्या जन्मापूर्वी देवदूत ग्रॅब्रिएलने मेरीला दृष्टांत देऊन ईश्वराचा मुलगा तुझ्या पोटी जन्म घेणार आहे, त्यासाठी तुझी निवड करण्यात आली आहे, असे सांगितले होते.

येशूच्या जन्मानंतर मेरी ही मदर मेरी म्हणून ओळखली गेली. येशूचे बालपण नाझरेथला गेले. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत त्याचे आयुष्य सर्वसामान्य ज्यूंप्रमाणेच होते. व्यवसायाने तो सुतार होता.

त्यावेळी इस्त्रायलमध्ये रोमन सम्राट सीझरचे राज्य होते. राज्य कसले हुकुमशाहीच ती. येशूने आता लोकांमध्ये प्रवचने द्यायला सुरवात केली होती. काही चमत्कारही दाखवले. वास्तविक तो फारसा फिरलाही नव्हता.

पण त्याची कीर्ति सर्वत्र पसरू लागली. त्या भागाचा रोमन गव्हर्नर, सम्राटाचे काही सरदार, ज्यू धार्मिक नेते यांनाही येशूच्या वाढत्या प्रभावाची दखल घ्यावी लागली. वास्तविक येशू प्रवचनात जो संदेश देत असे तो अगदी साधा होता.

त्याचा संदेश असा होता. १) देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तो तुमच्याबरोबर आहे. २) एकमेकांवर प्रेम करा. ३) प्रत्येक व्यक्तीचा मान राखा. ४) देवाचे राज्य पृथ्वीवर अवतरले आहे. ५) देवाचा न्यायतराजू स्वर्ग किंवा नरकाकडे झुकतो. ६) देवाला शरण जा तो तुम्हाला माफ करेल.

येशू स्वतःला आपण देव असल्याचे सातत्याने सांगत होता. ज्यू धर्म असलेल्या रोमन साम्राज्यात हे सहन होणे शक्य नव्हते. हे तर ज्यूंच्या धार्मिक नियमांचे उल्लंघन होते. त्यामुळे कट्टर ज्यू धार्मिक नेत्यांनी येशूला सुळावर चढवावे अशी मागणी रोमन साम्राज्याकडे केली.

मात्र, प्रत्येकवेळी येशू कुठल्याच कायद्याचे उल्लंघन करत नसल्याचे आढळले. इतकेच नव्हे तर ज्यू नेत्यांनीही येशू ज्यू कायद्याचे पूर्णपणे पालन करत असल्याचे सांगितले. मात्र, तरीही धार्मिक ज्यू नेते आपल्या म्हणण्यावर ठाम होते. त्यांनी

अखेर इस्त्रायलच्या दक्षिण प्रांताचा गव्हर्नर पायलेट याला येशूला फाशी देण्यासाठी राजी केले. त्यानंतर येशूला पकडून त्याला जेरूसलेमला नेण्यात आले. तेथे त्याचा अनन्वित छळ करण्यात आला. क्रूसाला टांगून त्याच्या शरीरावर खिळे ठोकण्यात आले.

अतिशय क्रूरपणे त्याला मारण्यात आले. पण आश्चर्य म्हणजे त्यानंतर तीन दिवसात येशू पुन्हा जिवंत झाला. हे पाहणारे पाचशेहून अधिक साक्षीदार होते, असे मानले जाते.

पुनर्जन्म झाल्यानंतर येशू सतत चाळीस दिवस इस्त्रायलच्या दक्षिण व उत्तर प्रांतात प्रवचने देत होता. त्यानंतर तो जेथे त्याला सुळावर चढविण्यात आले, त्या जेरूसलेमला आला. आता तो देव असल्यावर लोकांचा विश्वास बसू लागला होता. त्यानंतर तो सदेह स्वर्गाला गेला.

या घटनेनंतर येशूच्या विचारांचा प्रसार झपाट्याने वाढू लागला. त्याच्या अनुयायांची संख्याही वाढू लागली. अवघ्या शंभर वर्षात रोमन साम्राज्यात ( युरोप आणि त्याला लागून असलेला आशियाचा काही भाग) त्याला मानणार्‍यांची संख्या खूपच वाढली.

इसवी सन ३२५ मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टटाईनने अधिकृतरित्या ख्रिश्चन धर्म स्वीकारला. मग रोमन साम्राज्याचा अधिकृत धर्म ख्रिश्चन झाला.