मावळत्या वर्षाला आपण परवाच निरोप दिला. बाय बाय करून टाकलं. पण टाकलं ते फक्त वर्षाला. वाईट गोष्टी आणि अवगुणांना बाय बाय केलं नाही. एक चांगली संधी आपण घालवली. पण एक संधी अजूनही शिल्लक आहे ती म्हणजे चांगले संकल्प करण्याची. ही संधी साधा. कारण संधी वारंवार येत नाही. धनुष्यातून सुटलेला बाण, बोललेला शब्द आणि गेलेली वेळ परत येत नाही.