1. धर्म
  2. »
  3. मुस्लिम
  4. »
  5. मुस्लिम धर्माविषयी
Written By एएनआय|

मुस्लिम धर्मातील प्रमुख पंथ

मुस्लिम धर्मातील प्रमुख पंथापैकी शिया व सुन्नी पंथ आहेत. मोहमद पैगंबर यांच्या देहांतानंतर मुस्लिम धर्माचे प्रतिनिधित्व कोणी करायचे याबाबत त्यांच्या अनुयायांमध्ये मतभिन्नता होती.

अबु बक्र यांना प्रतिनिधी मानणार्‍यांचा पंथ सुन्नी धर्मिय म्हणून ओळखल्या जावू लागला. अबु बक्र सुन्नी पंथाचे पहिले कलिफा होत. सुरूवातीच्या काळात कलिफा पदी लोक प्रातिनिधिक स्वरूपात निवड होत असे.

अली यासं मोहमद पैगंबरांचा प्रतिनिधी मानणारया अनुयायांचा पंथ म्हणजे शिया पंथ. शिया पंथीय आपल्या धार्मिक प्रतिनिधीस इमाम म्हणतात.

इमामाचे पद हे वंशपरंपरागतरित्या बहाल करण्यात येते. धर्माचे प्रतिनिधी कोण याबाबत दोन पंथामध्ये मतभिन्नता असली तरि मोहमद पैगंबर हेच शेवटचे धर्मगुरू असल्याबाबत त्यांच्यात एकवाक्यता आहे.