अधिकमासात प्रभू विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे प्रभावी मंत्र जपावे
हिंदू धर्मात अधिकमासाचे खूप महत्त्व आहे. याला मलमास आणि पुरुषोत्तम मास देखील म्हटलं जातं. या महिन्यात प्रभू विष्णू, महादेव आणि हनुमानाची पूजा केल्याने विशेष फल प्राप्ती होते. या काळात श्रीमद्भभागवत कथा ऐकण्याचे देखील लाभ असल्याचे सांगितले गेले आहे.
भगवान विष्णूंना अधिकमासाचे अधिपती देव मानले गेले आहे. या महिन्यात विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष मंत्र जप करावे. खालील दिलेले मंत्र जप करुन आपण श्रीहरीची कृपा मिळवू शकता. होय, जप मात्र तुळशीच्या माळीने करावा. तसेच पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि पिवळ्या रंगाचं आसान असल्यास अती उत्तम प्रभाव पडेल.
गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणम्।
गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियम्।।
पुरुषोत्तम मासातील विशेष मंत्राचा जप केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनात सुख येतं.
ओम नमो भगवते वासुदेवाय।
देवाची विधीपूर्वक पूजा करुन या मंत्राचा दररोज जप करावा.
ऊं नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
भगवान विष्णूंचा हा गायत्री महामंत्र आहे. पूजेनंतर या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचं कल्याण होतं.
शांता कारम भुजङ्ग शयनम पद्म नाभं सुरेशम।
विश्वाधारं गगनसद्र्श्यं मेघवर्णम शुभांगम।
लक्ष्मीकान्तं कमल नयनम योगिभिर्ध्यान नग्म्य्म।
वन्दे विष्णुम भवभयहरं सर्व लोकैकनाथम।।
विष्णू रूपं पूजन मंत्र जप केल्याने देवाची आराधना होते ज्याने ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.