गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By
Last Modified: गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (10:19 IST)

Dr. Babasaheb Ambedkar यांचे प्रेरक विचार

(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही.
 
(२) देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.
 
(३) माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.
 
(४) वाचाल तर वाचाल.
 
(५) इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे.
 
(६)  मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
 
(७) तिरस्कार माणसाचा नाश करतो.
 
(८) ज्यांच्या अंगी धैर्य नाही, तो पुढारी होऊ शकत नाही.
 
(९) शक्तीचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.
 
(१०) शंका काढण्यास देखील ज्ञान लागतं.
 
(११ ) आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
 
(१२ ) हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.
 
(१३ ) नशिबावर नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.
 
(१४) ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.
 
(१५ ) वाणी व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. त्यासाठी मनाला संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.
 
(१६) माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
 
(१७ ) पती- पत्नी मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.
 
(१८) जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.
 
(१९) तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
 
(२०) प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.
 
(२१) मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
 
(२२ ) तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.
 
(२३) स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.
 
(२४) कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.
 
(२५) बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.